नासा ग्लोबल कंपनी पुरवत असलेल्या सेवा सुविधांबद्दलची विस्तारित माहिती

जाहिराती

नासा ग्लोबल जाहिरात कंपनी ही गेली २२ वर्षे जाहिरात क्षेत्रात काम करत आहे. उमेदवारांच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांना प्रिंट क्रिएटिव्ह, व्हिडिओ, ऑडिओ, ऍनिमेशन इत्यादी प्रकारच्या स्वरूपातील जाहिराती बनवून त्या उमेदवारांना प्रस्तुत करण्याचे काम नासा ग्लोबल कंपनीमार्फत केले जाते. नासा ग्लोबल कंपनीने बनवलेल्या अनेक जाहिराती प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. म्हणुन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार नेहमीच नासा ग्लोबलला पसंती देतात.

नासा ग्लोबल जाहिरात कंपनी
प्रचार व प्रसिद्धी

निवडणुकांसाठी उमेदवारांच्या प्रचार व प्रसिद्धीची कामे

लोकसभा व विधानसभा, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, कारखाना, जिल्हा बॅंका इत्यादी निवडणुकींसाठी प्रचार व प्रसिद्धीची कामे नासा ग्लोबल करते. जाहिरातींमार्फत जनतेच्या काळजाला साथ घालणारे विषय, उमेदवारांनी विभागात केलेली कामे लोकांपर्यंत अचूक पोहचवते. निवडणुकांचे सर्वेक्षण करणे, निवडणुकांसाठी रणनीती आखणे ह्यात नासा ग्लोबल कंपनीचा हातखंडा आहे.

TVC

टिव्ही कमर्शिअल्स हे लोकांपर्यंत पोहचण्याचे अत्यंत प्रभावी साधन आहे. सध्याच्या काळात ग्राहकांना आकर्षक व नाविन्यपूर्ण जाहिराती बनवून हव्या असतात. नासा ग्लोबल कंपनीकडे अशा अनेक तज्ञमंडळींची टीम आहे, ज्यांच्या आकर्षक व नाविन्यपूर्ण संकल्पनेची अंमलबजावणी करून नासा ग्लोबल कंपनी टिव्ही कमर्शिअल्स बनवते आणि त्यामुळे ग्राहकांची मागणी पूर्ण होते.

टीव्ही कमर्शिअल्स
माहितीपट

माहितीपट

उमेदवारांनी लोकहिताची केलेली कामे, महत्त्वाचे निर्णय, एखाद्या घटनेबद्दल, गोष्टीबद्दल, गावाबद्दल किंवा व्यक्तीबद्दल विस्तृत स्वरूपाची माहिती माहितीपटामार्फत मांडण्यात येते. माहितीपट बनवून लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम नासा ग्लोबल कंपनी करते. उदा. निवडणुकीच्या प्रचारासाठी एखादी माहितीपट (Documentary) बनवायची असल्यास उमेदवाराने आपल्या विभागात जनतेला गरजेच्या वेळेला केलेली मदत, स्थानिक लोकांना त्याचा झालेला फायदा, जनतेचा अनुभव / प्रतिक्रिया इत्यादी.

जिंगल्स आणि गाणी

नासा ग्लोबल कंपनी ही जिंगल्स आणि गाणी बनविण्याचे काम करते, ग्राहकांची मागणी समजून घेऊन त्याप्रमाणे जिंगल्स आणि गाणी नासा ग्लोबल कंपनी  बनवते, त्यासाठी लागणाऱ्या तज्ञ मंडळींची टीम म्हणजेच दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, म्युझिक कंपोझर्स अशी तज्ञ मंडळी कंपनीसोबत काम करतात.

जिंगल्स आणि गाणी
ग्राफिक्स (Gif), ऍनिमेशन, स्टॅटिक इमेजेस, प्रिंट क्रिएटिव्हस इत्यादींमार्फत जाहिरात

Gif / Static Images / Print Creative’s

नासा ग्लोबल कंपनी ग्राफिक्स (Gif), ऍनिमेशन, स्टॅटिक इमेजेस, प्रिंट क्रिएटिव्हस इत्यादींमार्फत जाहिरात करण्याचे काम देखील करते. यासाठी तज्ञ ग्राफिक्स डिझाइनर व तज्ञ एडीटर्सची टीम कंपनी कडे आहे. जी उमेदवारांच्या मागणीनुसार त्यांना गोष्टी बनवून देतात व उमेदवारांची गरज पूर्ण करतात.